chetant087

July 16, 2011

राजकारणींसाठी

Filed under: Uncategorized — chetant087 @ 12:46 am

राजकारणींसाठी–

 

हे आमचा संयम आहे-

याला दुर्बलता समझू नका

 

दिले मत देशाची प्रगती करा म्हणून

फक्त घोटाळ्यांतच वेळ घालवू नका,

 

आमची ओळख तुम्ही कधीच विसरले- (हे माहीत आहे आम्हाला )

पण- या मातीच ऋण विसरू नका,

 

शिवाजी, सावरकरांना जन्म दिला या मायीने-

षंड राजकारण करून तिचा अपमान करू नका,

 

आता तरी कर्तृत्व दाखवा आणि

या मातीचा चारित्र्य राखा आणि राखवा…

हे आमची विनंती नाही-

चेतावनी आहे,

आम्ही शांत आहो हा आमचा संयम आहे ह्याला-

आमची दुर्बलता समझू नका.

 

 

-चेतन

Advertisements

July 15, 2011

एक इंटरनेट प्रेम कथा… ;)

Filed under: विनोदि कविता :) — chetant087 @ 2:48 am

त्या दिवशी तिला,

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवला,

तिने accept पण केला,

आणि आमचा chatting   सुरु झाला….  ;)

 

गेले दिवस चार – पाच…

राहू ना गेले मलाच…

न वेळ घालवता म्हणालो मी तिला-

” I Love You”

“आवढतेस खूपच तू –

देशील का दिल तुझा, मला तू…. ”

 

सुन्न होउन काही वेळ….

एकदाच खिदकन हसाली….

भिती वाटली मला.. खरंच…–

कुठे वेढी तर नाही झाली ? ?  ?     ???

 

थोड्या वेळानंतर तिची हँसी थांबली…

त्यनंतर smiley पाठवत म्हणाली–

“माझ्याशी बोलता असे का वाटले तुला… ? ?

जर मी असे काही सांगितले असेन तर – माफ कर मला…

पण मी असे काही बोललि असे काही आठवत नाही मला…. :-\" title=

मी काहीच करु शकत नाही जर ” Infatuation ”  झाला असेल तुला…

 

आपण फ्रेंड्स राहू शकतो – ‘जर काहि प्राब्लेम नाही तुला’…

तुझी  online hunt  चालू दे जर Girl friend  हवी असेल तुला….”

 

त्या दिवसातून बनलो मी तिचा Friend

आता परत शोधत आहे नवीन Girl Friend….    :P

Confusion

Filed under: विनोदि कविता :) — chetant087 @ 2:45 am

आज सकाळ सकाळी क्लासमधे तिने..

आमच्या कडे बघून स्माइल दिलं….  ;)

पण….

हेच नाही कळाला की …

ते होता माझ्यासाठी ? ?   की …

माझ्या बाजुवालेला ….   :P

प्रश्न आणि उत्तर…

Filed under: विनोदि कविता :) — chetant087 @ 2:39 am

माझा नाकारावर रूसलेल्या त्या मोहनांगीने मला विचारले-

“का नाकारलस तू मला ?-

वाटत नाही का सुंदर मी तुला? ”

 

जणू मी संकष्टात पडलो…

की-

“हे कसे समजवायचे तिला ?”

 

जेव्हा तिने खरं सांगण्यास शप्पथ घेतली-

मी सत्यवचनाची प्रत हातात घेतली….

वाचून सांगितला मी तिला-

“पहिले “declaration” ‘For safety’- म्हणून-

जबाबदार तुम्हीच हे ऐकल्यावरचा परिणामांना-

ऐकू शकले नाहीत तर द्या बोट कानांना”

 

म्हणालो मी तिला-

“तुझे-

ते रेशमी केसं,

गुलाबी गाल,

मधूंनी भरलेले ओठ,

मादक डोळे…

चाफ्या सारखा नाक..

चंद्रमाचा चेहरा…

वेड लावणारा तो सौंदर्य..

गज- गमनेची ती चाल..

मंद- गमनेची ती बोली…

 

– हे सर्व पाहून मला वाटले, की –

मी तुला “शोकेस”- मधे ठेऊ शकतो – हृदयात नाय…..

लेखनी आणि अश्रू

Filed under: विरह कविता — chetant087 @ 2:20 am

 

कविता वाचता वाचता…

जुन्या आठवणींत गुंतून गेलो….

 

गुंतलाच तर …

बाहेर येता येता …..

विसरलेले काही घाव पुनः बाहेर घेउन आलो…

 

लपून शांत बसलेले ते घाव….

पुन्हा…

त्याच आधीच्या तीव्रतेने दुखू लागले…

पुन्हा एकदा जीवंत होउन — खूनाचे अश्रू  बहावू लागले….   :(

 

जेव्हा हे असहनीय झाले तेव्हा….

न कळताच ……

माझ्या मनात एक प्रश्न आला….—

 

“का लिहतात हे कवी —

अशी कविता ज्याने—

लपलेले घाव पुन्हा जीवंत होतात?” …….

 

तेव्हा त्या माझ्या जखमी हृदयाने- उत्तर दिले —

” भरले आहेत त्यांचेही हृदय —

असल्या हजारो घावांनी…

म्हणूनच …..

त्यांची लेखनीही ‘असे’ – खूनाचे अश्रू रडतात….”

विसर????

Filed under: विरह कविता — chetant087 @ 2:18 am

रोज माझी वाट पाहायची तू…

उशीर झाल्यावर मित्रांशी विचारायची तू…

 

मी हसलो नाही तर … तुला रडू येई…

कारण कळल्याशिवाय तुला चैनच न येई….

 

न सांगताच सारे दुःख कळायचे तुला….

माझ्या घावांमधे दर्द व्हायचे तुला…

 

तुला-

माझ्या मौनातच शब्द ऐकायचे…

माझ्या शून्य द्शटीत अर्थ मिळायचे ….

माझ्या विना जगच सूना वाटायचा…

मी नाही दिसलो तर काहीच नको व्हायचे….

 

पण……..  आज…….?

– माझी आठवण नाही आली ?

– मी उशीर झाल्याचा तुला कळालच नाही ?

 

वाट पाहत राहिलो त्या नेहमीच्या जागेवर….

पण….. —  तू तिथे येईनाच…….

पाहता पाहता अंधार होउ लागला…..

पण — तुझा कातुरलेला चेहरा मला दिसेना…….

 

वाट पाहता पाहता… अंधाराने मला घेरले…..

पण….–तुझी प्रेमळ मिठी मला भेटेनाच……

माझी ती हँसी  हमेशासाठी विरघळून गेली त्या अंधारात….

न राहवता भरुन आले डोळे अश्रूंनी…

पण…– न आलेल्या तुला ते कधीच दिसेना…..

 

तुझ्या विना जगच सूना म्हणायची तू…..

त्या साठीच का….

निघून गेलीस — मला इथेच सोढून…

… हमेशासाठी…?

 

तुझ्याविना नाही जगू शकत म्हणायची ना तू?

मग…

मला विसरुन जाताना…

हेच नाही कळाला तुला….

की…

कसा जगू शकतो मीही तुझ्या विना???

हे सोप्पा नाही…

Filed under: विरह कविता — chetant087 @ 2:08 am

तुला-

नाव लिहून मिठवणे-

एवढा सोप्पा का वाटतं ? ?….

हा माझा ‘हृदय’ आहे-

तुझी शाळेतली मातीची पाटी नाही….

 

आता –

लिहलेच आहे तर राहू दे ते तसेच…

मिठविण्यास प्रयत्न करशीस तर …

करशीस आणखी काही घाव…

कधीच न मिटणारे…..

Create a free website or blog at WordPress.com.